काम शासनाचे आणि उदघटनाचे श्रेय मात्र काडीमात्र संबध नसणाऱ्या नेत्यांचे
शिरटी / प्रतिनिधी
शिरटी ता. शिरोळ येथे उद्या होणाऱ्या विविध विकासकामांचे उदघाटन केवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले जात आहे. यात निधी शासनाचा आणि उदघटनाचे श्रेय आपल्याच मार्जितल्या नेत्यांना असा थाट सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांनी लावला आहे असा आरोप विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य विपुल कोगनोळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन पाण्याची टाकी बांधण्यासाठी व १ कोटी ४६ लाख मंजूर झाले असून ही योजना केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. मात्र याच्या उदघाटनासाठी विद्यमान आमदार, खासदार यांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. २९ लाख रुपये खर्च करून फक्त पूर्व गावठाणमधील अंतर्गत रस्ते करण्यात येणार असून हा निधी हा मा. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेला आहे. स्वछ भारत मिशन योजनेअंतर्गत चार सीट सौचालय मुतारी व त्या योजनेतून घंटागाडी खरेदी करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन हसन मुश्रीफ यांनी राज्यशासन कोट्यातील निधी गावाला दिलेला आहे. तसेच १५ वा केंद्रीय वित्त आयोग यातून अंदाजे ३० लाखापर्यंतचा निधी गावांत विविध विविध विकास कामासाठी खर्च करण्यात येणार आहे. सदरचा निधी हा केंद्र शासनाचा असून तो विकाकामासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. असे असताना फक्त जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी सदस्यांनी गावातील नागरिकांची दिशाभूल करून काम एकाचे आण नाव दुसऱ्याचे असा चुकीचा प्रकार चालवला आहे. विकासकामाला आमचे सदैव सहकार्य आहे. मात्र असा चुकीचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी चालवल्याने याचा आम्ही सर्व विरोधी सदस्य तीव्र निषेध करून उदघाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे कोगनोळे यांनी सांगितले.
सध्या जिल्हा परिषद सदस्य परवीन दादेपाशा पटेल यांच्या फंडातून या पाच वर्षात १ कोटींहून अधिक कामे केली आहेत. तसेच मा. राज्यमंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून दोन वर्षात दीड कोटींहून अधिक निधी देऊनसुद्धा फक्त राजकीय स्वार्थासाठी आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन गावातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेस ग्रामपंचायत सदस्य अभय गुरव, रामदास भंडारे, विपुल कोगनोळे, किशोर कांबळे, कुमार रोजे, निलेश सूर्यवंशी, स्वप्नील पाटील, कार्तिक कांबळे आदी उपस्थित होते.
0 Comments