कटरीना कैफ व विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पोलिसांनी केली अटक



कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवून आरोपीला अटक केली आहे. मनविंदर सिंह असे अटक आरोपीचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी मनविंदर हा अभिनेता आहे. तो कतरिनाचा फॅन आहे. तसेच तिच्याशी विवाह करण्याची त्याची इच्छा होती. एवढंच नाही तर तो तिला पत्नीही मानायचा. 


आरोपी मनविंदर हा मुंबईत राहतो. तसेच इन्स्टाग्रामवर त्याने कतरिना कैफचा उल्लेख आपली पत्नी असा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी हा कतरिना कैफ हिला सोशल मीडियावर स्टॉक करत होता. अखेर कतरिनाने वैतागून याबाबतची माहिती पती विकी कौशल याला दिली. तेव्हा विकीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने विकीलाच जीवे मारण्याची धमकी दिली. 


जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम ५०६-II आणि ३५४-डी अन्वये गुन्हा दाखल केला. अखेर पोलिसांनी आरोपी मनविंदर याच्या मुसक्या आवळल्या.

Post a Comment

0 Comments