सोलापूर : दहा हजाराची लाज येताना वायरमेन एलसीबीच्या ताब्यात



राहुल बिरबल गंगणे, वय ३० वर्षे, व्यवसाय नोकरी पद वायरमन (टेक्नीसियन) म.रा.वि.वि कंपनी मर्या. शाखा कार्यालय सांगोला असे अटक करण्यात आलेल्या वायरमनचे नाव आहे.


यातील तक्रारदार यांनी त्यांचे घरात काही दिवसांपुर्वी लाईट गेल्याने त्यांचे मिटरची पाहणी करुन त्याचे वायर काढुन चेक केले व सदरचे वायर परत मिटरला लावले. परंतु सदर वायर लावते वेळी तक्रारदार यांनी चुकीची वायर जोडणी केली. दि.०२/०७/२०२२ रोजी यातील वायरमन गंगणे यांनी तक्रारदार यांचे घराचे मिटर चेक करुन मिटरचा फोटो काढला असता त्यांना विज मिटर मध्ये छेडछाड केली असल्याची बाब निदर्शनास आली त्यावरुन तक्रारदार यांना ५०,००० रुपये दंड लागणार असे म्हणुन साहेबांना बोलुन दंड न करण्याबाबत सांगणेकरीता व दंड न करण्याकरीता तक्रारदार यांचेकडे १०,००० रुपये साहेबांकरीता द्यावे लागतील असे म्हणुन लाच मागणी केली. 


तक्रारदार यांचे तक्रारीवरुन करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान यातील आलोसे गंगणे यांनी तक्रारदार यांचेकडे विज मिटर मध्ये छेडछाड केल्याबाबत रु ५००००  दंड लागेल असे सांगुन दंड न करण्याकरीता १०००० रु लाचेची मागणी केली व सापळा कारवाईदरम्यान सदर लाच रक्कम स्वतः स्विकारली असता यातील आरोपी लोकसेवकास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.


ही कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि सोलापूर पोलीस अंमलदार पकाले, सण्णके, पवार सर्व ने. अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.

Post a Comment

0 Comments