करमाळा! कोळगाव येथे पाच वर्षाच्या मुलाचा सर्पदंशाने मुर्त्यू



करमाळा तालुक्यातील कोळगाव येथे सुमारे पाच वर्षाच्या मुलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अर्णव सचिन माने असे त्याचे नाव आहे. त्याला दोन बहिणी आहेत. गुरुवारी (ता. 30) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली ही घटना घडली. माने कुटुंब कोळगाव येथे राहतात. अर्णव हा मामाच्या मुलांबरोबर घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये खेळत होता. खेळत असताना तो शेडमधील अँगललला लोंबकळत होता. तेव्हा वरील बाजूला साप होता हे त्याला दिसले नाही.

 मात्र तो ज्या अँगलला लोंबकळत होता त्याच्याच वरील बाजूला असलेल्या सापाने त्याला दंश केला. त्यानंतर त्याने हा प्रकार आजोबाला सांगितले. त्याला तत्काळ करमाळा येथील रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला अकलूज येथे नेले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे कोळगावसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्णव जेव्हा लोंबकळत होता तेव्हा त्याचे आजोबा त्याला लोंबकळू नको असे सांगत होते. मात्र तेव्हा मला उंची वाढवायची आहे. म्हणून लोंबकळत असल्याचे त्याने सांगितले. हेच त्याचे शेवटचे शब्द असल्याचे सांगितले जात आहे. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील सचिन व त्यांच्या कुटुंबियानी खूप प्रयत्न केले मात्र उपयोग झाला नाही.

Post a Comment

0 Comments