बॉलिवूड अभिनेता करतोय २४ वर्ष लहान अभिनेत्रीला डेट


 
बॉलिवूडमधून दररोज अनेक अभिनेता-अभिनेत्रींच्या घटस्फोटाच्या आणि रिलेशनशीपच्या बातम्या येतच असतात. कधी कोणाच घटस्फोट होतो, तर कधी कोणाचं रिलेशनशीप चर्चेत येते.आता अशाच एका रिलेशनशिपची चर्चा सुरु आहे. या रिलेशनशीपमध्ये अभिनेता तब्बल २४ वर्ष लहान अभिनेत्रीला डेट करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा अभिनेतो नेमका आहे तरी कोण याची चर्चा रंगलीय.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने मलायका अरोरा सोबत घटस्फोट घेतले. या घटस्फोटानंतर अरबाज खानचे नाव ३० वर्षीय जॉर्जिया एंड्रियानीसोबत सतत चर्चेत असते. अरबाज अनेक वर्षापासून जॉर्जियाला डेट करतोय. दररोज तो तिच्यासोबत स्पॉट होत असतो. त्यामुळे या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असतात.

जॉर्जिया एंड्रिया सोशल मीडिय़ावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. नुकताच जॉर्जियाने बहीण आणि मैत्रिणीसोबत बेबी बंप दाखवणारा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये जॉर्जिया डीपनेक कॅमेऱ्यासमोर ब्रालेस फ्लॉंट करताना दिसत आहे. या तिच्या फोटोची खुप चर्चा रंगली आहे.

लुकची चर्चा
जॉर्जियाने या फोटोत हलक्या तपकिरी आणि पांढर्‍या संयोजनात एक सैल फिटिंग ड्रेस परिधान केला आहे. या अभिनेत्रीच्या ड्रेसचा गळा खुपच खोल आहे. यासोबतच अभिनेत्रीच्या ब्रा लाईनच्या खाली कमरेच्या दोन्ही बाजूला ड्रेसमध्ये मोठा कट आहे. हा कट आणि डीप नेक जॉर्जियाला बोल्ड लूक देत आहे.जॉर्जियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.

 जॉर्जिया या फोटोच्या कॅप्शन लिहते की, ‘माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..माझ्या जिवलग मित्रा..मी तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाही.’ जॉर्जियाच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. बहुतेक चाहते फायर आयकॉन शेअर करत आहेत, तर काही चाहते हार्ट आयकॉन शेअर करत आहेत.

Post a Comment

0 Comments