बार्शी! चिंचोली गावामध्ये महिलेला काठीने मारहाण; दोघांवर पांगरी पोलिसात गुन्हा दाखल




चिंचोली गावातील भवानी वस्ती येते एका महिलेला दोघांनी काठीने मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली आहे, अशा लक्ष्मण शिंदे वय ५५ रा. चिंचोली ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी, ९ जुलै रोजी सकाळी सातचे सुमारास मी गांवातून माझ्या घराकडे येत असताना, आमच्या गांवातील भवानी वस्तीजवळ आले असता, विजय सूर्यभान शिंदे व अमोल बाळासाहेब शिंदे (दोघेही रा. चिंचोली, ता. बार्शी) यांनी विनाकारण त्यांच्या हातातील काठीने माझ्या दोन्ही पायाच्या नडगीवर, हाताच्या कोपऱ्यावर, पाठीवर, मांडीवर मारहाण करुन शिवीगाळी दमदाटी केली. फिर्यादीने दिलेल्या तक्रार नुसार दोघा जनावर भादवि कलम ३२३,३२४,३४,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments