भाजप माजी जिल्हाध्यक्ष देशमुखांची पोलिसांत हजेरी, आज पुन्हा ठाण्यातलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सदर बझार ठाण्यात मंगळवारी हजेरी लावली. गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारीही ते हजेरी लावतील.
महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागलेले देशमुख यांच्यावर पुणे येथील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तपासाकरिता तो सोलापूर येथील सदर बझार पोलिस ठाण्यात वर्ग केला. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यात त्यांना अटकेपासून दिलासा मिळाला. परंतु न्यायालयाने पोलिस ठाण्यात हजेरीची अट घातली. त्यामुळे देशमुख मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलिसात हजर झाले होते. त्यांच्यासोबत वकीलही हजर होते. तपासाधिकारी अश्विनी भोसले यांच्यासमक्ष त्यांनी पोलिस ठाण्यात हजेरी लावली. त्यानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने देशमुख यांच्याकडे चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हजेरी आणि चौकशीनंतर तब्बल दोन तासांनी देशमुख हे पोलिस ठाण्याच्या बाहेर पडले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले करीत आहेत.

त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यात त्यांना अटकेपासून दिलासा मिळाला. परंतु न्यायालयाने पोलिस ठाण्यात हजेरीची अट घातली. त्यामुळे देशमुख मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलिसात हजर झाले होते. त्यांच्यासोबत वकीलही हजर होते. तपासाधिकारी अश्विनी भोसले यांच्यासमक्ष त्यांनी पोलिस ठाण्यात हजेरी लावली. त्यानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने देशमुख यांच्याकडे चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हजेरी आणि चौकशीनंतर तब्बल दोन तासांनी देशमुख हे पोलिस ठाण्याच्या बाहेर पडले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले करीत आहेत.

Post a Comment

0 Comments