बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील पाथरी गावांमध्ये मासे धरायला गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ७ जुलै रोजी उघडकीस आली आहे.
सुदर्शन जगदाळे वय ३० रा. घारी ता. बार्शी असे मृत्यू युवकाचे नाव आहे. सुनील जगदाळे (वय ५४, रा. घारी) यांनी याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पांगरी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुदर्शन जगदाळे ५ जुलै रोजी दुपारी दोन वाजता मित्र गुंड यांच्यासमवेत पाथरी तलावावर मासे धरण्यासाठी गेले होते.
0 Comments