18 जून रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान बार्शी तालुक्यातील धामणगाव येथे वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर वर कारवाई करून तीन लाखाचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला आहे. मौजे धामणगाव येथील नागझरी नदी पात्रात माने वस्ती जवळ एक डंम्पीग ट्राली असलेला न्यु हलंड ट्रक्टर नंबर नसलेला हा नागझरी नदी पात्रात मौजे धामणगाव या ठिकाणी वाळु भरत असताना आमचे शासकिय वाहन पाहुन पळवुन घेऊन गेला व त्या ठिकाणी वाळु भरणारा एक इसम यास आम्ही पाठलाग करुन जागीच पकडले त्याची विचारपुस केली.
प्रताप मारुती बनसोडे रा हत्तीज ता बार्शी यास आम्ही सरकारी वाहनात घेवुन आम्ही सदर ट्रक्टरचा पाठलाग करु लागलो व सदर ट्रक्टरचे चालकास ट्रक्टर उभा करणेस इशारा केले असता ट्रक्टर चालकाने ट्रक्टर उभा केला नाही व आम्हास पाहुन ट्रक्टर वेगाने पळवु लागला. त्यामुळे आम्ही शासकिय वाहनाने ओव्होरटेक करुन, ट्रक्टर थांबविणेबाबत इशारे करत ट्रक्टरचे पुढे जात असताना ट्रक्टर चालकाने आमचे शासकीय वाहनास ट्रक्टर आडवा घालुन, कट मारुन शासकीय वाहन रस्त्याचे खाली घातले आहे. व ट्रॅक्टर शेतामध्ये पळवुन गेला. आम्ही त्याचा पाठलाग केला परंतु रस्ता खराब असल्याने व शासकीय वाहन जात नसल्याने ट्रक्टर चालक ट्रक्टर वाळु भरलेल्या ट्रालीसह पळवुन घेऊन गेलेला आहे.
18/05/2022 रोजी 12/30 वा. चे सुमारास माने वस्तीजवळ नागझरी नदीचे पात्रात मौजे धामणगाव येथे न्यु हलंड ट्रक्टर नंबर नसलेला या ट्रक्टरचा चालक विकास जयराम दळवी रा हतीज ता बार्शी तसेच ट्रॅक्टरचे मालक प्रविण तुकाराम सुरवसे रा धामणगाव ता बार्शी व माऊली पंखे रा राळेरास ता बार्शी आणि डपींग ट्रली हे त्या ठिकाणी मिळुन आले नाहीत. म्हणुन माझी त्यांचेविरुध्द सरकार तर्फे भा.दं.वि. कलम 353, 379, 34 व पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9, 15 प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. ही कारवाई महिला पोलिसांनी पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे आहे.
0 Comments