मंगळवेढा/प्रतिनिधी:
बोराळे रोड वरती दोन ठिकाणी पाईप मोरीचे काम करण्यात आले. काम करून सहा महिने झाले नाहीत पहिल्याच पावसात त्या ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे या ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.त्यामुळे या कामाची तात्काळ चौकशी करून ते काम करणाऱ्या ठेकेदारावर व काम करून घेणाऱ्या शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करावी तसेच शाखा अभियंता यांच्याशी चर्चा केली असता ते काम पूर्ण झाले नाही असे सांगण्यात आले. सहा महिने झाले काम पूर्ण होऊन तरी काम पूर्ण झाले नाही अजून काम चालू आहे असे चुकीची माहिती सांगून वेळ मारून नेण्याचे काम अधिकारी करत होते.
तसेच डागडोजी करण्या ऐवजी ते पूर्ण उखरून त्या ठिकाणी शासनाच्या कार्यारंभ आदेशा प्रमाने काम करण्याची मागणी तसेच निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आली. यावेळी प्रहारचे शहर अध्यक्ष सचिन साळुंके, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख राजू सावंत,जिल्हा उपाध्यक्ष पाटील मॅडम, कार्याध्यक्ष अमोगसिद्ध काकनकी, संपर्क प्रमुख चेतन वाघमोडे,विभाग प्रमुख सारिका कवचाळे, विभाग प्रमुख नवनाथ सिरसटकर विभाग संपर्क प्रमुख महेश तळऴे,फैयाज मुलानी, अमोगसिद्ध् पाटील, मलकांना अथनी,नागेश बनसोडे, बापू घोडके , बंडू कोळी, आप्पाराया काकनकी,सिद्धाप्पा काकनकी,मल्लु तळ्ळे,राजकुमार स्वामी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments