बार्शी शहरांमध्ये रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना जास्त पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेऊन कल्याण नावाच्या मटक्याचा जुगार खेळवीत आहे अशी खात्रीलायक माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार आशा टॉकीज च्या जवळील पानटपरीच्या आडोशाला पाहणी केली असता अमर मिया शेख वय ३४ रा. अशा टॉकी रोड बार्शी व आनंद सुभाष विकणे रा. बार्शी हे दोघेजण बेकायदा जुगार घेत असल्याचे पोलिसांना आढळले.
पोलीस कॉन्स्टेबल अविनाश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वतःच्या फायद्याकरता लोकांना जास्त पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेऊन कल्याण नावाचा मटका आकड्याच्या चिठ्ठ्या देऊन कल्याण जुगार खेळत व खेळत असताना दोघेजण आढळून आले आहेत, त्यांच्याकडे जुगाराचे साहित्य, आकड्याचा कागद, निळ्या शाईचा बॉल पेन, रोख रक्कम आढळून आले म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा १२ अ प्रमाणे बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments