सोलापूर! राष्ट्रवादीच्या विद्या लोलगेवर गुन्हा दाखल;गॅसचा काळा बाजार

 
सोलापूर:

एम. आय. डी. सी पोलीस स्टेशन हद्दीतील सिध्देश्वर नगर भाग ४ येथे घरगुती वापरातील गॅस टाक्या इलेक्ट्रीक मोटारीने व्यवसायीक गॅस टाकी मध्य भरुन देत आहे. याबाबत खबऱ्याने पक्की माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस शिपाई भारत पाटील यांना दिली होती. गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, एपीआय  नंदकिशोर सोळुंके व एपीआय दादासो मोरे यांनी पथकासह छापा टाकुन कारवाई केली.यामध्ये सोलापूर क्राईम ब्रँचने कारवाई करत राष्ट्रवादीच्या विद्या लोलगे व जकीर अब्दुल सत्तार (वय ४२ रा,सिद्धेश्वर नगर भाग ४ ,सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

७९ टाक्या जप्त करत १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

गुन्हे शाखेने केलेल्या  कारवाई मध्ये इंण्डेन कंपनीचे व्यवसायीक ११ गॅस टाक्या  व रिकाम्या १४ टाक्या, घरगुती वापरातील २९ गॅस टाक्या  व रिकाम्या २४ व एक व्यवसायीक वापराची एक लहान गॅस टाकी अशा एकुन ७९ गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या. तसेच इलेक्ट्रीक मोटार इलेक्ट्रीक बोर्ड, वायर, स्वीच व आयकॉन कंपनीचा वजन काटा असा एकूण  १ लाख ३८ हजार २७२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाई वेळी पोलिसांनी जाकीर अब्दुल सत्तार सय्यद, (वय ४२ वर्षे, रा- सिध्देश्वर नगर भाग ४ , सोलापुर )यास ताब्यात  घेण्यात आले. पुढील कारवाई साठी एम. आय. डी. सी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. जिवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ सह भादंवि २८६, ३३६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments