नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एन.डी.ए.ने आपला उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. भा.ज.पा.चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, भा.ज.पा. संसदीय मंडळाने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी २० नावांवर चर्चा केली. त्यानंतर पूर्व भारतातील आदिवासी महिलेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. द्रौपदी मुर्मू भा.ज.पा.च्या उमेदवार असतील.द्रौपदी मुर्मूच्या प्रवासाविषयी सांगायचे तर, त्यांनी ओडिशात नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
एन.डी.ए.चे उमेदवार मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात झाला.द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एक नगरसेवक म्हणून केली.नंतर त्या रायरंगपूर राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या उपाध्यक्षा बनल्या. २०१३ मध्ये त्या पक्षाच्या एस.टी. मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याच्या पदावर पोहोचल्या. तत्पूर्वी द्रौपदी मुर्मू ओडिशात भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात २०००-२००२ पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक विभागाच्या स्वतंत्र प्रभारासह ६ ऑगस्ट २००२ ते मे पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.
द्रौपदी मुर्मू या २००० आणि २००४ मध्ये ओडिशाच्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. पुढे २०१५ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. झारखंडच्या राज्यपालपदाची शपथ घेणार्या त्या पहिल्या महिला आहेत. तसेच राज्यपालपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या ठरल्या आहेत. दरम्यान, निवडून आल्यानंतर द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील. याशिवाय त्या ओडिशातून आलेल्या पहिल्या राष्ट्रपतीही असतील. राजकारण आणि समाजसेवेत त्यांनी जवळपास दोन दशके काम केलं आहे.
0 Comments