माढा तालुक्यातील सापटणे येथे भावकीतील वैमनस्यातून झोपेत असताना अंगावर उकळते तेल टाकून एका ५५ वर्षीय इसमाचा खून करण्यात आला. शहाजी गोविंद ढवळे (वय५५ रा. सापटणे) असे मयताचे नाव आहे. त्यांचा खून केल्याप्रकरणी संतोष राजेंद्र ढवळे (वय ३०) आणि नरसिंह राजेंद्र ढवळे (वय ३२ दोघे रा.सापटणे) या यांच्याविरुद्ध टेंभुर्णीच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहाजी ढवळे आणि त्यांची पत्नी अनिता ढवळे असे दोघे रविवारी रात्री जेवण करून घरात झोपले होते. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी अनिता या पिकास पाणी देण्याकरिता दरवाजा उघडा ठेवून गेल्या होत्या. साधारणतः दीड वाजेच्या सुमारास शहाजी यांच्या अंगावर उकळते तेल फेकल्याने ते झोपेतून खडबडून जागे झाले. तेव्हा पळून जाताना संतोष ढवळे आणि नरसिंह ढवळे हे त्यांना उजेडात दिसून आले.
त्यानंतर गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना टेंभुर्णी येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात (राहुल) मुलगा यांनी दाखल केले. उपचारादरम्यान शहाजी ढवळे हे आज मंगळवारी सकाळी मरण पावले. दरम्यान त्यांनी दिलेल्या मृत्यूपूर्व जवाबावरून पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास फौजदार ओमासे हे करीत आहेत.
0 Comments