बार्शी! शेंद्री गावामध्ये शेत रस्त्याच्या जुन्या वादातून तलवार लोखंडी गज व काठीच्या साह्याने मारहाण


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील शेंद्री येथे आमच्यावर कोर्टात दावा टाकता काय म्हणत गादेकर कुटुंबीयांना तलवार, लोखंडी गज व लाकडी कटीने मारहाण केल्याची घटना २१ जून रोजी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. मकरंद मधुकर गादेकर (वय २२) रा. तांबडेवाडी गादेकर वस्ती शेंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोडलिंगे कुटुंबातील ४ जणांवर तसेच इतर पाच ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, बेकायदेशीररित्या जमाव जमून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज लाकडी काठीने व तलवारीने मारहाण करून दमदाटी करून शिवीगाळही केली आहे. मकरंद गादेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोरख बळी कोडलिंगे, वैभव गोरख कोडलिंगे, वैष्णव गोरख कोडलिंगे, शितल गोरख कोडलिंगे व इतर ५ ते ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमीवर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल ही हिसकावून घेऊन गेल्याची फिर्याद यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments