आज महाराष्ट्रभर आमदार प्रकाशरावजी आबिटकर यांनी शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाऊन बंड केलं, अशी बातमी प्रसारमाध्यमांद्वारे समजते. नेमकं यामध्ये आमदार साहेब त्यांच्या इच्छेखातर गेलेत का...? कि त्यांच्यावर दबाव आहे म्हणून गेलेत याचा खुलासा होत नाही... यावर राजकिय विश्लेषकांची अनेक मते आहेत. राजकीय खलबतेही अनेक आहेत, पण याला बंड म्हणावे का? आकडेवारीवरून हा प्रश्नही येथे उपस्तिथ हाेताे.
कारण प्रस्थापितांच्या विराेधात लोकांच्या प्रश्नासाठी, आणि प्राथमिक मूलभूत गरजांसाठी, लोकहितासाठी आमदारकी मिळवली , कार्यसम्राट म्हणून आमदार अबिटकर साहेबांची आज प्रखर ओळख आहे आहे. त्यामुळं आमदार अबिटकर आज जो काही विचार घेऊन निर्णय घेत असतील तो मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने याेग्यच असेल यात तिळमात्र शंका नाही. २०१९ चा विचार केला तर जिल्ह्यात शिवसेनेतून आपल्या कर्तुत्वाने भगव्या झेंड्याखाली निवडून येणारा एकमेव आमदार म्हणून अबिटकर साहेबांची ओळख आहे, कारण २०१९ च्या निवडणुकीत सर्व मातब्बर नेते एका बाजूला आणि २०१४-२०१९ या कालावधीत केलेल्या कामांच्या जाेरावर मूठभर मावळ्यांना घेउन लढणारे अबिटकर साहेब एका बाजूला अशी परिस्तिथी हाेती, तरीदेखील सर्वसामान्य जनतेने स्वहित आणि जनहित लक्षात घेऊन पुन्हा एकदा साहेबांना मोठया मताधिक्याने प्रतिनिधित्वाची संधी दिली, ती केवळ जनहितासाठीच...
एक आमदार म्हणून दुर्गम भागातील मुलभूत समस्यांच निवारण असाे अथवा पुनर्वसन, विद्यार्थीहीत, शेतकरीहीत अशा अनेक प्रश्नांना अभ्यासू विश्लेषणाच्या जाेरावर विधानसभेत मांडून न्याय देण्याच काम गेली ८ वर्षे अबिटकर साहेब करत आहेत. हा मतदार संघ विकासकामांच्या उंचीतून पूढं न्यावयाचा असेल तर त्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आम. प्रकाश अबिटकर यांच्यासारखी दुरदृष्टीसाेबत कर्तृत्वाची उंची असलेली व्यक्ति असायला हवी हे मात्र नक्की. "राधानगरी-भुदरगड-आजरा" हा आपला मतदारसंघ केवळ ग्रामीणच नाही तर डाेंगराळ-कड्याकपाऱ्यांनी वाड्यांमध्ये विखूरलेला आहे, त्यामुळे अजूनही काही विकासकामे अजूवही मार्गी लावायची आहेत. त्यासाठी मतदारसंघाची पाहणी करून याेग्यरित्या विकासकामांची आखणी करण्याचे काैशल्य आमदार अबिटकर साहेबच करू शकतात हे आपण गेली ७-८ वर्षात पाहिलयं. त्यामुळे अभ्यासू कार्यशैली, मतदारसंघातील मुलभूत प्रश्नांची जाण, कार्य करण्याची प्रचंड इच्छाशक्ती यांमुळे खेड्यापाड्यात क्रांती जर घडवायची असेल आणि गाेरगरिबांना मुलभूत साेयसुविधां गोर-गरिबांसाठी पोहचवायच्या असतील अबिटकर साहेबांशिवाय आज मतदारसंघात पर्याय नाही हे देखील निर्विवाद सत्यच आहे. त्यामुळे साहेबांचा मार्ग काेणताही असला तरी साध्य हे मतदारसंघाच्या विकासासाठीच असेल हे मात्र नक्की.
शेवटीं इतकंच की .... पक्षाची गणित नेत्यांसाठी असतात, पण ज्या माणसाने नेतेगिरी साेडून विकासकामे लाेकांच्या उंबऱ्यापर्यंत नेलीत.... लोकहो त्या कार्य सम्राटाचं कार्य इतक्यात तरी बेदखल करू नका.
काेल्हापूरची जाणती भुमी असं करणार नाही हा विश्वास आहे... त्यामूळे चुकीच्या भुल-थापांना, अपप्रचाराला बळी पडनू एका कर्तृत्ववान माणसाचं कार्य नाकारू नका. कारण वाकिघाेलसारख्या दुर्गम ग्रामीण भागात निर्माण केलेल्या विकासाच्या प्रकाशवाटा आजही सर्वसामांन्यासाठी दिशादायी ठरताहेत. हीच त्यांच्या कार्याची आेळख आहे जी खाेट्या अपप्रचाराने काहीजण पुसू पाहत आहेत पण साहेबांनी जनमानसात पेरलेली कामं, ही अशी सूडबुद्धीने नष्ट होणार नाहीत, त्यामुळे आपल्या कार्यसम्राटाचे कार्य इतक्यात बेदखल करू नका.
श्री. सुनिल गुंडू दळवी
(वाकीघाेलकर)
0 Comments