मराठा आरक्षण आंदोलनातील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे आदेश


मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरु आहे. परंतु काही आंदोलनांमधील गुन्ह्यांची नोंद अद्याप झाली नसल्याचे आढळून आले आहे. या सर्व आंदोलनांचा आढावा घेऊन तात्काळ माहिती सादर करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी संबंधित जिल्हा पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिले.

प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या तसेच प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मराठा मोर्चा संघटनेचे प्रतिनिधी आणि शासन यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रतिनिधींसोबत योग्य तो समन्वय ठेवावा असे निर्देशही त्यांनी दिले.

Post a Comment

0 Comments