सोलापूर! जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त स्वाक्षरी अभियान


सोलापूर;

  जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हुतात्मा स्मृती मंदिर येथे स्वाक्षरी अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते स्वाक्षरी करून झाले. यावेळी तंबाखू विरोधी दिनानिमित्त उपस्थित नागरिकांना तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. निलेश कोकरे यांनी शपथ दिली. 

तंबाखूच्या व्यसनामुळे कॅन्सरसारख्या आजाराचे बळी वाढत असून युवापिढी त्यात अडकत चालली आहे. तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या स्वाक्षरी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद आणि सोलापूर जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, सिव्हील हॉस्पिटल यांच्यावतीने या स्वाक्षरी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
 
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुद्धा स्वाक्षरी करून या मोहिमेत सहभाग नोंदवला. याप्रसंगी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्या वतीने विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. किरण पोटे, डॉ. रोहन वायचळ, अमित महाडिक यांच्यासह डेंटल कॉलेजचे विद्यार्थी व अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments