आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-20 लीग म्हणून ओळखली जाते. दरवर्षी या लीगमध्ये क्रिकेट जगतातील मोठे खेळाडू खेळायला येतात. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर करोडो रुपये खर्च केले जातात, पण आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला किती रक्कम बक्षीस म्हणून दिली ( How much reward ) जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? आयपीएलमध्ये चॅम्पियन बनणाऱ्या संघापासून ते चौथ्या स्थानापर्यंतच्या संघाला बक्षिसाची रक्कम दिली जाते. आयपीएल 2022 मध्ये कोणत्या नंबरचा संघ किती मालमाल होईल चला जाणून घेऊया....
आयपीएल 2022 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स ( Gujarat Titans and Rajasthan Royals ) यांच्यात होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला ( IPL 2022 Title Winner ) 20 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. जगभरात खेळल्या जाणार्या वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये हे बक्षिस सर्वाधिक आहे. अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये दिले जातील. गेल्या वर्षी ही रक्कम 12.5 कोटी रुपये होती. आयपीएल 2022 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांना 7-7 कोटी रुपये देखील दिले जातील.
आयपीएल स्पर्धा 2008 ( IPL 2008 ) मध्ये सुरू झाली आणि हा 15 वा हंगाम खेळला जात आहे. आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रात फायनल जिंकणाऱ्या संघाला 4.8 कोटी रुपये मिळाले होते. ही बक्षीस रक्कम आता जवळपास चौपट वाढली आहे. गतवर्षी विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 कोटी देण्यात आले होते. यंदाही ही बक्षीस रक्कम तितकीच ठेवण्यात आली आहे.
जगभरात खेळल्या जाणाऱ्या विविध T20 लीगमध्ये जास्त बक्षीस रक्कम दिली जात नाही. आयपीएलनंतर कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक मोठी रक्क्म बक्षीस म्हणून दिली जाते. सीपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 7.5 कोटी रुपये दिले जातात. त्याच वेळी, पाकिस्तान सुपर लीग (PSL) पेक्षा बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) मध्ये अधिक बक्षीस रक्कम दिली जाते. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये 6.34 कोटी रुपये आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये 3.73 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाते.
0 Comments