सोलापूर! आठ दुचाकी चोरणाऱ्या तरुणास अटक, २ लाख ३५ हजरांचा मुद्देमाल जप्त



सोलापुरात आठ मोटार सायकल चोरी करणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. जेलरोड पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाने ही कार्यवाही केलीय. विकी शिवाजी डांगे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दोन लाख ३५ हजरांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. 

सोलापुरात मागील काही दिवसांपासून मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ झालीय. चोरीला गेलेल्या मोटारसायकलीचा तपास करत असताना जेलरोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला चोरी करण्यात आलेली बिगर नंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन आरोपी तरुण थांबला माहिती मिळाली. माहितीवरून डीबी पथक जोडबसवण्णा चौक जवळ गेले.  तेव्हा आरोपीकडे गाडीच्या कागदपत्रे विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा आरोपी विकी यास ताब्यात चौकशी केल्यानंतर एकूण आठ मोटारसायकल चोरल्याची कबुली त्याने दिली. ह्या आठ ही दुचाकी सोलापूर शहर हद्दीतुनच चोरीला गेल्या होत्या.

Post a Comment

0 Comments