मोहोळ! घरासमोरच विवाहित मुलीच्या मृतदेहाचे दहन


माढा तालुक्यातील मिटकलवाडीयेथे धक्कादायक घटना घडली आहे. एका विहीरीत एका विवाहितेचा मृतदेह आहे. सासरकडून विवाहितेचा छळ होत होता. त्यांनीच तिची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला आहे, असा आरोप मुलीच्या माहेरच्या कुटुंबाने केला आहे. माहेरकडील संतप्त झालेल्या कुटुंबाने सासरच्या घरापुढे मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीसांत तक्रार दिली आहे.

 अंजली हनुमंत सुरवसे, असं मृत विवाहितेचं नाव आहे. तिचा २०१६ मध्ये हनुमंतसोबत विवाह झाला होता. अंजली मूळची पंढरपूर तालुक्यातील उंबर पागे गावची होती. तिचं लग्न मिटकल वाडीतील हनुमंतशी लावण्यात आलं होतं. लग्नच्या सहा वर्षांनंतर अंजलीच्या मृत्यूनं तिच्या माहेरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल न केल्याने संतप्त नातेवाईकांनी मुलीचे सासर असलेल्या माढ्याच्या मिटकलवाडीतील घरासमोरच विवाहित मुलीच्या मृतदेहाचे दहन करुन आपला रोष व्यक्त केलाय. 

Post a Comment

0 Comments