बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे 22 वर्षीय विवाहित राधा ऊर्फ अस्मिता पाडुरंग पवार रा. मळेगाव ता बार्शी महिलेने 15 एप्रिल रोजी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली होती, तिच्या आत्महत्या पैशासाठी केल्याचा आरोप मुलीच्या वडीलाने केला असून जयराम कुंडलिक कात्रे (वय ४१) रा म्हसोबाचीवाडी ,ता वाशी ,जि -उस्मानाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह सासू सासरे यावर पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलीला लग्नानंतर काही दिवस चांगले सांभाळले त्यानंतर पैशासाठी वारंवार त्रास देऊन आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. दिनांक 29/09/2019 पासुन मुलगी राधा हीस ट्रँक्टर घेणेसाठी 5,00000/-रूपयाची वारंवार मागणी केलेमुऴे त्यांना पैसै देवुनही तसेच द्राक्षे बागे करीता 1,20000/-रू दिले असतानाही त्यांनी परत द्राक्षेचे बागेच्या कामासाठी 60,000/-रूपयाची वारंवार मागणी करून मुलीस शिवीगाळी मारहाण करून, तीला जेवायला न देणे,उपाशीपोटी ठेवुन जाचहाट करून तीला त्रास देत होते.त्या त्रासाला कंटाळुनच मुलगी राधा ऊर्फ अस्मिता पाडुरंग पवार वय 22वर्ष रा मळेगाव ता बार्शी हीने दिनांक 15/04/2022रोजी सकाळी 08/12वा चे पुर्वी तीचे राहते घरामध्ये गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.तीला सासरच्या लोकांनी त्रास दिलेमुळे त्या त्रासाला कंटाळुन तीला आत्महत्या करण्यास परावृत्त केले आहे.
याप्रकरणी नवरा पाडुरंग नागनाथ पवार ,सासु मंगल नागनाथ पवार, सासरे नागनाथ विठ्ठल पवार सर्व रा मळेगाव ता बार्शी यांच्यावर पांगरी पोलिस स्टेशनमध्ये भादवि कलम ३०६,३३२,३४,४९८,५०४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments