करीना कपूरची मलाबार गोल्डची जाहिरात वादात..!



मलाबार गोल्ड अँड डायमंड्स’ या प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडची नवी जाहिरात सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने या नव्या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यामध्ये अभिनेत्री करीना कपूर खान  पहायला मिळतेय

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स’ या प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडची नवी जाहिरात सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने या नव्या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यामध्ये अभिनेत्री करीना कपूर खान पहायला मिळतेय. अक्षय तृतीयानिमित्त जाहिरात करणाऱ्या करीनाने तिच्या कपाळावर टिकली  लावली नाही म्हणून नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. #BoycottMalabarGold आणि #NoBindiNoBusiness हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले आहेत. अक्षय तृतीया हा हिंदूंसाठी पवित्र सण आहे आणि या दिवशी अनेकजण दागिन्यांची खरेदी करतात. हिंदूंच्या सणाच्या जाहिरातीत करीनाने कपाळावर टिकली का नाही लावली, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
‘मलाबार गोल्डच्या नव्या जाहिरातीने सणाचा माहौल कसा खराब करायचा याचं उदाहरण सादर केलंय. भारतीय महिलांच्या पेहरावात टिकली हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही हिंदू परंपरांची खिल्ली उडवल्यानंतर आम्ही तुमचे दागिने खरेदी करू असं वाटतंय का’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘मलाबार गोल्ड खरंच हिंदू संस्कृतीचा सन्मान करते का’, असा सवाल दुसऱ्याने केला. ‘मलाबार गोल्डला जर टिकलीचं महत्त्व समजत नसेल तर अशा ब्रँडला बाहेरचा रस्ता दाखवायची वेळ आली आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

नो बिंदी नो बिझनेसचा ट्रेंड
गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त सणाला पूरक अशा दागिन्यांच्या जाहिराती वृत्तपत्र आणि होर्डिंगच्या माध्यमातून सुरु झाल्या होत्या. यावर असलेल्या मॉडेल्सच्या कपाळावर ‘टिकली’ नसल्याने हा वाद सुरु झाला होता. कपाळावर टिकली असणं हा हिंदू धर्माचा एक भाग असल्याचं म्हटलं गेलं. तर, दिवाळी हा देखील हिंदू सण असून, जाहिरातींमधील मॉडेल्सच्या कपाळावर टिकली नसल्याने हिंदूंचा अपमान होत असल्याचा दावा केला जात होता. याविरोधात लेखिका शेफाली वैद्य यांनी ‘नो बिंदी नो बिझनेस’ ही मोहीम सुरु केली होती.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘तनिष्क’ या ज्वेलरी ब्रँडवरही नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. तनिष्कच्या जाहिरातीतून लव्ह-जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला होता. या ट्रोलिंगनंतर अखेर ब्रँडला ती जाहिरात काढावी लागली होती.

Post a Comment

0 Comments