विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फळाफुलांची सजले, विठुरायाचे पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची रांग


पंढरपूर:

गुढी पाडवा अर्थात मराठी नविन वर्षा निमित्त श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात विविध रंगांची तब्बल 2 टन फुले आणि 1100 किलो फळे वापरून मनमोहक आरास करण्यात आली आहे. फळे फुलांची आरास करण्यासाठी चिखली येथील नाना बबन मोरे, नवनाथ नामदेव मोरे यांनी मदत केली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे. विठ्ठल मंदिर समितीकडून पहिल्याच पदस्पर्श दर्शन करणाऱ्या दांपत्याचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.


गुडीपाडव्याला श्री विठ्ठल- रुक्‍मिणीचा गाभारा आणि मंदिरातील अन्य भागात फळाफुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यासाठी गुलाब, जरबेरा,शेवंती, झेंडू,तगर, ऑर्किट अश्या 2 टन वेगवेगळ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय अननस, संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंब अशा विविध फळांची आणि पानांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अधिक खुलून दिसत होते.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू केले आहे विठ्ठल रुक्माई मंदिराचे प्रथम चरण दर्शन घेण्यासाठी आलेल्या दाम्पत्याचा मंदिर समितीकडून गुलाब देऊन स्वागत करण्यात आले. श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात करण्यात आलेली ही आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.  परगावाहून देखील मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दर्शनासाठी आले असल्याने मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला आहे. विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती दिली आहे

Post a Comment

0 Comments