बार्शी तालुक्यातील पुरी गावाजवळ ट्रॅव्हल्स व टँकर यामध्ये अपघात घडला आहे, टँकर चालक नामदेव यशवंत घोलप, वय 48 रा तळेगाव, ता.जि.बीड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅव्हल चालकावर गुन्हा भादवि कलम २७९,३३७,३३८,४२७ मोटर अधिनियम १८४, १३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना ही 9 एप्रिल रोजी रोजी सकाऴी 06/30 वा सुमारास अशोक लिलँड कंपनीचा टँकर पासींग नंबर MH23AU3001 यामध्ये मोलासीस भरून निरा बारामती कडे जात असताना समोरून ट्रँव्हल्स पासींग नंबर NL01B1859 हा बार्शी कडुन लातुर कडे रोडचे परिस्थीतीकडे लक्ष न देता भरधाव वेगात येवुन माझ्या टँकरला समोरून धडक देवुन कट मारून टँकरचे समोरची काच व मोलासीस ची टाकी चेमटुन तसेच शो पिस चिमटुन माझे गाडीचे अंदाजे 50000 रू.चे नुकसान करणेस व ट्रँव्हल्स मधील 1)रीतेश नरसिंग शिंदे 2)नितेश नरसिंग शिंदे 3)नरसिंग शिवाजी शिंदे 4)महादेवी अशोक गायकवाड सर्व रा भवानी दाबका ता औराद जि बिदर राज्य कर्नाटक व इतर दोन इसम त्यांचे नाव गाव पत्ता माहिती नाही यांना लहान मोठी दुखापत होणेस कारणीभुत ठरला आहे म्हणुन ट्रँव्हल्स चालक दिनेश किसन मंडलीक वय 37 वर्षे रा नारायणगाव ता जुन्नर जि पुणे यांच्यावर पांगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments