वैराग/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील वैराग मध्ये दारासमोर का टाकला म्हणत एकावर ब्लेडने वार केला तर महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. सुनिल आदिनाथ काळे (वय- ३५) रा- संजयनगर वैराग त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना आहे वैराग मधील संजय नगर मध्ये २ मार्च रोजी संध्याकाळी पावणे सहाच्या दरम्यान घडली. फिर्यादी व त्याची आई घरांमध्ये असताना त्यांच्या घरा शेजारी राहणारे १)सुहास सुर्यंकात मगर २) राम सुर्यंकांत मगर ३)विकास सुर्यंकांत मगर फिर्यादीच्या घरात आले, दारासमोर मुरूम का टाकला म्हणत त्यातील एकाने फिर्यादी वर ब्लेडनं वार केला तर सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या आईलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. फिर्यादीचे खिशातील पाचशेच्या दोन नोटा घेऊन निघून गेले. तुम्ही तुमच्या दारातील मुरूम काढून टाका नाहीतर बघून घेतो अशी धमकी देऊन ते तिघेजण निघून गेले, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार त्या तिघांवर भादवि कलमा नुसार ३२३, ३२४, ३२७, ३४, ४५२, ५०६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments