गोव्यात पार पडला राहुल चहरचा विवाह, पाहा फॅशन डिझायनर इशानीचा ब्रायडल लुक



भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज राहुल चहरने गर्लफ्रेंड इशानीसोबत लग्न केले आहे. त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग ९ मार्च रोजी गोव्यात पार पडले. 

राहुलची पत्नी इशानी ही बंगळुरूची रहिवासी असून ती व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते.

राहुल चहर हा आग्रा जिल्ह्यातील रहिवासी आहे. राहुल आणि इशानी यांची डिसेंबर २०१९ मध्ये एंगेजमेंट झाली होती. पण कोरोनामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले.

 राहुल आता १२ मार्चला आग्रा जिल्ह्यात रिसेप्शन ठेवणार आहे. हे रिसेप्शन पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे.

राहुल आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. तो पंजाब किंग्जकडून खेळणार आहे. राहुल गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला होता. यावेळी पंजाब संघाने मेगा लिलावात राहुलला ५.२५ कोटींची बोली लावून विकत घेतले आहे.

राहुलने लग्नाचे काही फोटोही शेअर केले आहेत. त्याने समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या हॉटेल डब्ल्यू येथे सात फेरे घेतले. राहुल आणि इशानी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

राहुल आणि इशानी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

Post a Comment

0 Comments