सांगोला/प्रतिनिधी;
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सख्ख्या भावाने पुतण्यासह पाच जणांनी मिळून शेजारी राहणाऱ्या भाऊ, भावजय व त्यांच्या मुलाला शिवीगाळ व दमदाटी करीत काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना रात्री १० च्या सुमारास सांगोला तालुक्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघे भाऊ कुटुंबासह एकमेकांच्या शेजारी राहत आहेत.
वर्षभरापूर्वीपासून चुलत दीर आणि भावजय यांच्यात संभाषण होते. त्या दोघांत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेतला जात होता. काकाने पुतण्याची बराच वेळा समजूतही चुलत दीराचे भावजयीबरोबर काढली होती. दरम्यान, रात्री १० च्या सुमारास पती व त्याची पत्नी दोघे जण मिळून जेवण करून घरासमोर बोलत बसले होते. त्यावेळी शेजारच्या दोन महिला आणि तीन पुरुष मिळून आले. त्याने पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत म्हणत नवनाथ कोठे आहे त्यास व तुम्हा दोघांना बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यावेळी त्यांनी त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध नाहीत. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असे समजावले असता त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच काठीने चुलत्याच्या डोक्यात मारून जखमी केले.
0 Comments