शिवसेना नेत्यावर बलात्‍काराचा आरोप करणाऱ्या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न


पुणे : 

शिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला  होता. त्या पीडित तरुणीने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने तरुणीला वाचवण्यात यश आले आहे.

पुण्यातील एका २४ वर्षीय तरुणीने लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. तसेच, त्यानंतर आरोपीने बळजबरीने गर्भपात करत, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रघुनाथ कुचिक यांच्यावर भादंवि कलम  ३७६,३१३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, २४ वर्षीय पीडितेने शनिवारी डेक्कन परिसरातील एका हॉटेलमध्ये जात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने फेसबुक लाईव्ह सुरु केले होते. त्यामुळे हा प्रकार समजल्यानंतर डेक्कन पोलीस आणि शिवाजीनगर पोलीस यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीडित तरुणी ची समजूत घालून तिला योग्य दिशेने तपास हे चालू आहे असा विश्वास दिल्याने अन तिने ऐकल्यावर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Post a Comment

0 Comments