एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वत:वर देखील धारदार शस्त्राने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रकार घडला आहे. आरोपी तरुण सुद्धा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपी तरुणाचं मृतक तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. आरोपी तरुणाचे नाव शुभम असं असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी तरुणाने मुलीला एमआयडीसी परिसरात भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर मुलीवर दगडाने हल्ला केला. दगडाने ठेचल्यावर आरोपी शुभम याने तरुणीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला आहे.
आरोपी शुभम याचं मृतक तरुणीवर प्रेम होतं. एकतर्फी प्रेमात तो वेडा झाला होता. या मुलीचं दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते असा संशय शुभमला होता. यानंतर शुभमने तिला एमआयडीसी परिसरात भेटायला बोलावले आणि मग तिच्यावर हल्ला केला.
तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी शुभम याने देखील स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. शुभम याने स्वत:वर देखील चाकूने वार केले. शुभम हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
त्या परिसरातील नागरिकांनी एक तरुण आणि तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहिलं आणि त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा तरुणीचा मृत्यू झाला होता तर आरोपी शुभम हा जखमी अवस्थेत होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी शुभम याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
0 Comments