बहुप्रतीक्षित पहिली हायड्रोजन कार भारतात दाखल झाली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज या गाडीतून प्रवास केला आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी या अद्ययावत कारमध्ये बसून आज संसदेत पोहोचले आहेत. यादरम्यान स्वच्छ इंधनावर धावणारी ही कार लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे.भारतीय रस्त्यांवरही आता लवकरच हायड्रोजन कार धावताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
या कारला टोयोटा कंपनीच्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत बनवण्यात आलं आहे. यात अॅडवान्स फ्युल सेल बसवण्यात आलाय. हा अॅडवान्स फ्युल सेल ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मिश्रणानं वीज उत्पन्न करतो. या विजेवरच कार धावते, उत्सर्जनच्या स्वरूपात या कारमधून फक्त पाणी निघते.हायड्रोजन कार ही पूर्णतः पर्यावरणाला अनुकूल असल्याचेही नितीन गडकरींनी सांगितले आहे.
0 Comments