कुंभारी गोदुताई विडी घरकुल येथील चोरटा वळसंग पोलीसांच्या ताब्यात; ३९ हजार ८९० रूपयांचा मुददेमाल जप्त



दिनांक ५ मार्च रोजी वळसंग पोलीस ठाणे येथे भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे फिर्यादी नामे श्रीनिवास अंबादास गुंडेटटी (वय वर्षे ३३,राहणार विडी घरकुल कुंभारी ता द सोलापूर) यानी त्यांच्या विडी घरकुल कुंभारी येथील वेनेला साडी सेंटर या दुकानाचे शटर उचकटुन दुकानातील साडया व रोख रक्कम तसेच त्याचे दुकानाशेजारी श्री मोबाईल शॉपी या दुकानातुन विविध कंपनीचे एकुण ९ मोबाईल व रोख रक्कम असे मिळुन एकुण ४१ हजार ६३४ रूपयांचा रोख रक्कम,साडया व मोबाईल असे अज्ञात चोरटयाने दुकानाचे शटर उचकटून दुकान फोडले आहेत म्हणुन गुन्हा दाखल होता.

सदर गुन्हयाचा तपास करता गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,विडी घरकुल येथे राहणारा आरोपी नामे नारायण प्रभाकर यन्नम (वय वर्षे २४) राहणार विडी घरकुल,कुंभारी हा नवीन मोबाईल कमी किमतीत विकत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर आरोपीस गुन्हयाचे कामी विश्वासात घेवुन तपास केला असता त्याने व जुना विडी घरकुल सोलापुर येथील विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी संगनमत करून विडी घरकुल कुंभारी येथील वेन्नेला साडी सेंटर व श्री मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर लोंखडी टॉमीचे साहयाने उचकटुन दुकान फोडले आहेत असे सांगुन गुन्हयातील एकुण ९ मोबाईल,वीस साडया व रोख रक्कम असे एकुण ३९ हजार ८९० रूपये असा मुददेमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधिक्षक हिंम्मत जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह
गौर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अतुल भोसले यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय हंचाटे,पोलीस हवालदार श्रीनिवास प्रकाश
दासरी,अभिजीत शिरीष रावडे,बाबुराव सिद्धमप्पा करपे,पोलीस नाईक मिलींद थावरू पवार,विक्रम देविदास माने,नरेद्ध सत्येद्र गायकवाड,पोलीस अंमलदार गणेश जगन्नाथ पाटील,शहाजहान सैपनशेख,रोहीत नागनाथ थोरात,सुनिल पांडुरंग राठोड,वैभव श्रीधर सुर्यवंशी,थरेप्पा कृष्णात व्हनमोरे,विशाल सुरेश मोरे तसेच चालक पोलीस फौजदार वाळुजकर,चालक पोलीस नाईक दिनेश काळोखे,पोलीस अंमलदार बनकर यांनी केली आहे.

तरी वळसंग पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण याचेकडुन जनतेस आवाहन करण्यात आले आहे की,सध्या उन्हाळयाचे सुटटया असल्याने परीसरातील नागरिकानी गावी जाताना त्याचे मौल्यवान वस्तु व रोख रक्कम हे सोबत घेवुन जावे व जाताना शेजारील लोकाना सांगुन जावे.

Post a Comment

0 Comments