बार्शी! लहान मुलाचे अपहरण करुन खून करणा-या नराधमास जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली




बार्शी/प्रतिनिधी:

लहान मुलाचे अपहरण करून खून करणाऱ्या नराधम आज जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एबी भस्मे यांनी सुनावली आहे. या प्रकरणी आरोप विश्वास जनार्दन साळुखे, वय-४० वर्षे, रा, भाट निमगाव, ता. इंदापूर, जि. पूणे यांच्यावर पोलीस स्टेशन- टेंभूर्णी पोलीस स्टेशन, सोलापूर गु.र.नं. १२७/२०१७ गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणांमध्ये
सरकारी वकील- अॅड. प्रदिपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील, सोलापूर यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अॅड. ए. आर. पाटील यांनी काम पाहिले.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, वर्षांच्या लहान मुलाचे अपहरण करुन खुन केल्या प्रकरणी भा.दं.वि. कलम ३६३, ३६४, ३०२ प्रमाणे दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणात सविस्तर हकिकत अशी की, दिनांक २३/०३/२०१७ रोजी सांयकाळी ०६:०० वा. सुमारास फिर्यादी रावसाहेब दत्तात्रय गायकवाड हे यात्रेतून घरी आले असता त्यांचा
मुलगा आर्यन हा घाबरलेला अवस्थेत दोन माणसांबरोबर घरी आला व त्याने फिर्यादीस सांगितले की, “दुपारी ०३.०० वाजण्याच्या सुमारास आपल्या गावातील विश्वास साळुखे हा मोटार सायकलवर आपले घरासमोर आला व तो मला व आपल्या इंद्रकुमार यास म्हणाला की, उजणी धरणाजवळील भीमा नगर येथे मासे आणायला जायचे आहे. गाडीवर बसा, तेंव्हा मी व इंद्रकुमार असे दोघे त्याच्या पाठीमागे मोटार सायकलवर बसलो त्यानंतर त्याने मला उजनी पाटीच्या पुढे संत गुलाब बाबा रसवंती गृहाजवळ हायवे रोडवर सोडले व तो इंद्रकुमार यास मोटार सायकलवर मासे आणायला नेतो म्हणून त्याला पुढे घेवून गेला. मी बराच वेळ त्या दोघांची वाट पाहिली पंरतु ते परत न आल्याने मी घाबरुन रडू लागलो. तेंव्हा माझ्याजवळ तेथील दोन माणसे आली. त्यांना मी घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांनी आर्यनला त्याच्या घरी आणले. तेंव्हा फिर्यादीने आर्यन बरोबर आलेल्या माणसांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आर्यन हा काय घडले हे सांगत असताना रडू लागला म्हणून त्याला घरी घेवून आलो." असे सांगितले. त्यानंतर सांयकाळी ०६.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या गावातील परमेश्वर ठाकर हे फिर्यादीच्या घरी आले तेंव्हा त्यांनी फिर्यादीस सांगितले की, “आपले गावातील विश्वास साळुखे याने इंद्रकुमार यास
भीमा नगर कॅनोल ते शिराळ पाटी गावाचे दरम्यान कोठेतरी शेतात मारुन टाकले आहे.

 त्यांना फोनवरून टेंभूर्णी पोलीस ठाण्याचे बाबर हवालदार यांच्याकडून समजले आहे." असे सांगितले, असता फिर्यादी व त्याचे नातेवाईक हे टेंभूर्णी पोलीस स्टेशन येथे आले असता फिर्यादीने चौकशी केली तेंव्हा मयत इंद्रकुमार यास आरोपी विश्वास साळुखे याने शिराळ गावाच्या हददीत आश्विनी
ढाब्याच्या जवळपास उसाच्या शेतात मारुन टाकले असून विश्वास साळुखे यास करमाळा पोलीस टेंभूर्णी पोलीस ठाणे येथे घेवून येत आहेत. असे समजले त्यांनतर फिर्यादी व त्याचे नातेवाईक
कबाडे साहेब व इतर पोलीस कर्मचारी यांचेसोबत आश्विनी ढाब्याकडे गेलो असता तेथे जवळपासच्या उसाच्या शेतात आम्ही सर्वांनी मयत इंद्रकुमार याचा शोध घेतला असता रात्री
अंदाजे ०९.०० वाजण्याच्या सुमारास मयत इंद्रकुमार याचे प्रेत सापडले तेंव्हा मयताच्या गळयास रुमाल आवळलेला, त्याची जीभ बाहेर आलेली व त्याच्या हाता-पायाला काळी माती लागलेली असे दिसून आले. यावरून फिर्यादीस खात्री झाली की, आरोपी विश्वास साळुखे याने मयत इंद्रकुमार यास मासे आणायला जायचे आहे असा बहाणा करुन त्याला फसवून त्याचे अपहरण करून त्याचा खुन केला आहे. सदर घटनेची फिर्याद फिर्यादीने टेंभूर्णी पोलीस स्टेशन मध्ये दिली असता पोलीसांनी भा.दं.वि. कलम ३६३, ३६४ व ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी न्यायालयात ११ साक्षीदार तपासले. सदर प्रकरणात वैदयकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा, घटनास्थळाचा पंचनामा व फिर्यादीचा जबाब महत्वाचा ठरला. या सर्व गोष्टींवरुन सदर आरोपी विश्वास जनार्दन साळुखे याने मयत इंद्रकुमार यास अपहरण करुन खुन केल्याचे युक्तीवादात सांगण्यात आले. मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन आजरोजी यातील आरोपी विश्वास साळुखे यास याबाबत दोषी धरण्यात आले. सदर प्रकरणात आजरोजी मा. न्यायालयात आरोपींच्या शिक्षेवर सुनावणी होवून सदर आरोपीस अपहरण करुन खुनाच्या अपराधाखाली जन्मठेपेची सुनावली आहे. सदर कामी जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तीवाद मा. न्यायाधीश मा जिल्हा व सत्र न्यायाधीश -२ श्री ए. बी. भस्मे साहेब यांनी ग्राहय धरुन अपहरण करुन खुन केल्याप्रकरणी आरोपी विश्वास जनार्दन साळुखे यास भा.दं.वि. कलम ३६३ प्रमाणे १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व रक्कम रु. १०००/- दंड सदर दंड न भरल्यास एक महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे, भा.दं.वि. कलम ३६४ प्रमाणे ०७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व रक्कम रु. १०००/- दंड सदर दंड न भरल्यास एक महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे, भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा व रक्कम रु.२०००/- दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले. तसेच मुळ फिर्यादी तर्फे अॅड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले. तर आरोपीच्या वतीने अॅड. ए. आर. पाटील यांनी काम पाहिले. सदर प्रकरणाचा तपास ए.पी.आय. श्री. जी. आर. बल्लाळ यांनी केला.

Post a Comment

0 Comments