राळेरास येथे अवैध वाळू वाहतूक करणार्‍या दोन इसमांविरुध्द वैराग पोलीसात गुन्हा दाखल; ५० लाख २१ हजार रुपयांचा ऐवज जप्त



वैराग/प्रतिनिधी:


वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर वैराग पोलिसांनी मोठी कारवाई करून 50 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे,दोघांविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी समाउन हबीब मोहमद (वय वर्षे 26),राहणार तालवारी,साटियारा,चिरटवा,पुर्णिया,चेरिया,बिहार तसेच आरोपी नादर आबूलाल शेख (वय वर्षै 50) राहणार जवळा,ता.सांगोला यांनी दि. 27 मार्च रोजी वेळ पहाटे 4:30 वाजता मोजे राळेरास,वैराग,जिल्हा-सोलापूर यांनी शासनाचा कसल्याही प्रकारचा पास परवाना न घेता अगर रॉयल्टी न भरता,पर्यावरणाचा -हास होत आहे हे माहीत असुन सुध्दा 50 लाख रु. कि. चा एक पिवळ्या रंगाचा एल अँन्ड टी कंपनीचा 200 मॉडेलचा विना नंबरची पोकलेन मशीन,21 हजार रुपये किंमतीचा पांढर्‍या रंगाचा टाटा कंपनीचा 1616 मॉडेलचा टिपर नं MH13 AN 2852 यात अंदाजे तीन ब्रास वाळु असा एकुण 50 लाख 21 हजार रूपयांचा ऐवज पोकलेन मशीनच्या साह्याने चोरून बाळू उपसा करून स्वतःच्या फायद्यासाठी चोरून टिपरमध्ये वाळू भरुन घेवून जात असताना मिळून आले.म्हणून या दोन्ही आरोपींविरुध्द  पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ नुसार 15,9,भादविक ३४,३७९ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार बाबर हे करीत आहेत.

ही माहिती सोमवार,दि.28 मार्च रोजी सोलापूर ग्रामिण पोलीस दलाकडून प्रेसनोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments