सोलापूर! ४ सराईत गुन्हेगार २ जिल्ह्यातून तडीपार


जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आल्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी काढला.

आकाश अनिल मुदगल (वय २९, रा. सिध्देश्वर हौसिंग सोसायटी सिध्दार्थ चौक), तानाजी हरिश्चंद्र चव्हाण (वय ४२, रा. राहुल गांधी झोपडपट्टी), सद्दाम जाकीर नाईकवाडी (वय २८, रा. मुस्लीम पाच्छा पेठ), सोहेल अफसर आडते (वय ३२, रा. मुस्लीम पाच्छा पेठ) असे तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या चारजणांनी जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी, वारंवार गुन्हे करणे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून सर्वसामान्य लोकांच्या मध्ये दहशत पसरवण्याचे काम करीत असल्याने त्यांच्या विरुध्द पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला त्यावर पोलीस उपायुक्तांनी या चार सराईत गुन्हेगारांना सोलापूर शहर व जिल्हा तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुका या हद्दीतून तडीपार करण्यात आल्याचा आदेश दिला.

 त्यानुसार जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, हवालदार शरीफ शेख, पोलीस नाईक राहुल दुधाळे, निलेश पाटील, सारंग लिगाडे, रमेश गवळी, विशाल बनसोडे, मल्लिकार्जुन चमके, दादासाहेब सरवदे, कल्लप्पा देकाणे, श्रीधर काळे, सोमशेखर उड़गी, अमीन शेख यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.

Post a Comment

0 Comments