बार्शी! फटे आर्थिक घोटाळ्यातील सह आरोपी भाऊ वैभव फटे याला जामीन मंजूर


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी येथील विशाल फटे या राज्यभर गाजलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भातील सहआरोपी भाऊ वैभव फाटे याला १० फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे तर विशाल फाटे यांचे वडील अंबादास पाटील यांच्या जामीन अर्जावर १६ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती विशाल फाटे यांचे वकील विशालदीप बाबर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. 


बार्शी येथे अनेक सर्वसामान्य नागरिकांना शेअर मार्केट च्या नावाखाली ज्यादा पैसे मिळवून देतो म्हणून विशाल फाटे यांनी कंपनी स्थापन केली होती. त्यात सर्वसामान्य बार्शीकर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी करोडो रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र यामध्ये विशाल फाटे याने नागरिकांची कोणताही परतावा न देता करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे पुढे आले. सदर प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असणाऱ्या विशाल फाटे हा आपल्या कुटुंबासह पोबारा झाला होता. त्यानंतर त्यांने सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आत्मसमर्पण केले होते.

फटे घोटाळ्यातील मुख्य आरोपी असणाऱ्या विशाल फाटे याच्यासह कंपनीमध्ये बरोबरच भागीदार म्हणून घरातील भाऊ वैभव फाटे व वडील अंबादास फाटे यांना अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने दहा फेब्रुवारी रोजी सहा आरोपी असणाऱ्या वैभव फाटे यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे तर वडील अंबादास फाटे यांच्या जामिनावर १६ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती वकील बाबर यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments