बार्शी/प्रतिनिधी:
शेताचा वाद कोर्टामध्ये नेला म्हणून दोघाच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण केल्याची घटना बार्शी शहरांमध्ये घडली आहे. संजय विलास आरगडे, (वय २७) रा. तावडी ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसात चोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची आई विश्रांता उर्फ छबन हीच्यामध्ये व आईची आजी चंपावती राऊत असे दोघीमध्ये माघील दिड वर्षापासुन जमीन वादावरून बार्शी कोर्टात वाद चालु आहे. १६ फेब्रुवारी रोजी आईची जमीन वाटपावरून बार्शी कोर्टात तारीख असल्याने फिर्यादी व माझा मित्र सुरज बाळासाहेब आरगडे, वय २३वर्षे, रा. तावडी ता. बार्शी असे दोघेजन सकाळी ११.३० वाजता बार्शी कोर्टात आलो होतो.
त्या वेळी चंपावती राऊत याचे तर्फे पिंटु गव्हाणे व दतात्रय ढेरे दोघे रा. बार्शी हे आले होते. दुपारी 01:30 वा. चे सुमारास फिर्यादी व सुरज असे कोर्ट आवारत उभे असताना पिंटु गव्हाणे, दतात्रय ढेरे व इतर दोन अनोळखी इसम हे जवळ आले व समोर असलेल्या संकेश्वर बागेत जावुन आपण शेतजमीन विषयी चर्चा करू असे म्हणाल्याने आम्ही सर्वजन संकेश्वर बागेत गेलो.
पिंटु गव्हाणे हा मला म्हणाला की, तु कोर्टात दावे दाखल करतो, तुला लय माज आला आहे का, तुला तावडी वरून इथे यायचे आहे, आम्ही इथले वजनदार आहोत असे म्हणुन पोटात लाथ मारली तेव्हा मी खाली पडताच दतात्रय ढेरे यांने पिशवीतुन एक पुडी काढली व त्या पुढीतील चटणी माझे अंगावर फेकली, तेव्हा सुरज हा मला सोडवण्यास आला असता दोन अनोळखी इसमांनी त्यास पकडले व हाताने मारहाण केली, तेंव्हा ढेरे याने तेथे पडलेले लाकडी दांडके उचलुन माझे पाठीत मारले. तेंव्हा पिंटु गव्हाणे यांने त्याचे पटच्या आतुन एक कुकरी काढली व ती मला मारू लागला तेव्हा सुरज हा मला वाचवण्यास आला असता त्याचे उजव्या हातास वार झाला तेंव्हा मी उठुन गेट उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मला गेट उघडु न देता त्यांनी ओरडा ओरड करून बोलवा रे आपली आणखी पोर बोलवा आज यांना जीवे ठार मारू असे म्हणाल्याने मी व सुरज तेथुन त्यांचे तावडीतुन निसटुन तेथुन पळुन गेलो. त्यानंतर मी ढगे मळा बार्शी येथील जमीनीत जावुन बसलो व त्यानंतर सुरज यांचेशी संपर्क करून आम्ही दोघेही सुविधा हस्पीटल बार्शी येथे उपचारास दाखल झालो आहे. दोघांवरही उपचार चालु असुन आम्ही पुर्णत: शुध्दीवर आहोत. झाले मारहाणीत सुरज याचे उजव्या हाताला जखम झालेली आहे, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments