करमाळा! मकाई कारखान्याचा विनापरवाना गाळप, पाच कोटी ६३ लाख रुपयांचा साखर आयुक्तांकडून दंड


करमाळा/प्रतिनिधी:

करमाळा तालुक्यातील मकाई साखर कारखान्यांना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ५ कोटी ६३ लाख रुपयांचा दंड केला आहे. मकाई साखर कारखाना कडे गाळप परवाना नसतानाही गाळप केल्याप्रकरणी हा दंड ठेवण्यात आलेली माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाअध्यक्ष विजय रणदिवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

 मकाई साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२०-२१ मधील शेतकऱ्यांची संपूर्ण एफआरपी न दिल्याने गाळप हंगाम साखर आयुक्तांनी मकाई कारखाना गाळप परवाना नाकारला होता. कारखान्यास गाळप परवाना नसतानाही बेकायदेशीरपणे कारखाने गाळप सुरू केले सदर साखर कारखाने १ लाख १२ हजार ६०५ टन ऊसाचे विना परवाना गाळप केलेले आहे. ,

मकाई सहकारी कारखानाकडून विना परवा परवाना गाळप केलेल्य ऊस गाळपावर .५०० प्रति टन प्रमाणे  पाच कोटी त्रेसष्ट लाख दोन हजार पाचशे या रकमेचा दंड आकारला आहे,  सदर दंडाची रक्कम मकाई सहकारी साखर कारखानाला आदेश झाल्यापासून १५ दिवसाच्या आत शासकीय कोषागारात भरणा करावी असा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे. 

Post a Comment

0 Comments