केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत शिवसेना नेत्यांना त्रास दिला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच यावेळी संजय राऊत यांनी भाजपला खुलं आव्हान देखील दिलं आहे. कितीही आमच्या पाठीवर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी धमक्या येत आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
उद्धवजी यांनी मला सांगितलं आहे की, सत्य जनतेसमोर येऊ द्या. हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. बाहेरची लोक आमच्या मुलींकडे पाहणार, भाजपची लोक टाळ्या वाजवणार, हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. तुम्ही काहीही करा हे सरकार पडणार नाही. तुम्हाला त्रास द्यायचा असेल तर मला द्या. असा तुरुंग अजून बनला नाही जो मला 2 वर्षे तुरुंगात ठेवू शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. शिवसेना आणि भाजपमधील वाद टोकाला पोहचल्याचं दिसत आहे. माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना त्रास दिला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ईडी आणि सीबीआयचा वापर करून आम्हाला त्रास दिला जात आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
0 Comments