तुळजापूर शहरातील दयानंद नगर येथील ४१ वर्षे युवकांनी राहत्या घरी दिंनाक ३१ जानेवारी रोजी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट आहे
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार , तुळजापूर शहरातील दयानंद नगर येथील दिनेश रवींद्र सुरवसे वय ४१ वर्षे हे दिनांक ३१ जानेवारी रोजी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी केशरी रंगाचा गमजा, पांढऱ्या रंगाची ओढणी एकत्र करून पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला मयत दिनेश सुरवसे यांना मृत अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आले मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
याप्रकरणी डॉक्टर एस एन पाटील वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांनी दिलेल्या एम एल सी वरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यु नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हवलदार विजय राठोड हे करत आहेत.
0 Comments