करमाळा:
करमाळा ते टेंभुर्णी महामार्गावर पांगरेजवळ ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर व टेंम्पोचा भीषण अपघात झाला आहे. साडेनऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून यामध्ये एकजण जागीच ठार झाला आहे. त्याचे नाव समजू शकले नाही. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर ट्रॅक्टरचे मागचे मोठे चाक तुटून पडले होते.
पांगरेजवळ रविवारी रात्री झालेल्या अपघात ठार झालेली व्यक्ती टेंम्पोची चालक असल्याचे समजत आहे. करमाळ्याकडून टेंभुर्णीकडे ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होता तर टेंभुर्णीकडून करमाळ्याकडे टेंम्पो येत होता. दरम्यान पांगरे येथील पुलाजवळ या दोघांची समोरासमोर धडक झाली. या धडकेचा जोरात आवाज आल्यानंतर तेथील काही अंतरावर असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
0 Comments