दिशा सालियानचे चारित्र्य हनन ; कारवाईची मागणी


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची एक पत्रकार परिषद आज पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रकरणांना घेऊन प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आक्रमक झाल्या आहेत.दिशा सालियानचे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चारित्र्य हनन केलं असून या प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गांभीर्याने दखल घ्यावी.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. भाजपकडून महिलांचे हनन केलं जात आहे. दिशा सालियानचे पोस्टमार्टम रिपोर्ट खोट ठरवण्याचे काम केंद्रीय मंत्री नारायण राणे करत असतील तर त्यांच्या खात्याची छाप त्यांच्यावर पडल्याचे दिसत आहे. असा टोला महापौर पेडणेकर यांनी लगावला आहे.

Post a Comment

0 Comments