भाजप नेते किरीट सोमय्या काल पुण्याच्या दौऱ्यावर असताना शिवसेनेचे कार्यकर्ते आणि त्यांच्यात धक्काबुक्की झाली.त्याबाबतचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. शिवसैनिकांसोबत झालेल्या झटापटीनंतर सोमय्या पायऱ्यांवरून खाली कोसळले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आता पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सात ते आठ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments