पंढरपूर/प्रतिनिधी:
दक्षिणेतील अभिनेता अल्लू अर्जुन याच्या पुष्पा या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यातील लाल चंदन तस्करीवर हा चित्रपट आधारलेला आहे त्याचा परिचय पंढरपूर तालुक्यातून 138 किलो चंदन जप्त केले आहे. चंदनाची तस्करी करणार्या दोघा जणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली आहे.
पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील दिलेले माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील पेनुर येथून टेम्पो मधून चंदन पंढरपूर तालुक्यातील तीन रस्ता येते घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. पथक तयार करून तीन रस्ता येथे तैनात करण्यात आले. पेनुर च्या दिशेने आलेल्या टेम्पो वाहनाची तपासणी केली असता. त्यामध्ये चार पोत्यांमध्ये 138 किलो चंदन आढळून आले. गाडी चालक रमेश महादेव तेलंग (वय 25 रा. तुंगत ता. पंढरपूर) व कचरूद्दीन जमादार (वय 35 रा. पेनुर ता. मोहोळ) यांना अटक करण्यात आली आहे.
पंढरपुर विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये सात लाख रुपये किमतीचे वाहन व 138 किलो चंदनाचे आठ लाख रुपये किमतीचे चंदन असा एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिलिंद पाटील यांनी दिली आहे, पुष्पा या चित्रपटातील दर्शवणारे चित्र पंढरपुरात पाहिल्याचे दिसून येत आहे.
0 Comments