पांगरी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील ममदापूर येथे मयताच्या नावाने असलेली जमीन हडप केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अश्विनी राजेंद्र यादव (वय वर्षे २८),राहणार वाणी प्लाँट,कँन्सर हाँस्पीटल जवळ,आगळगाव रोड,तालुका बार्शी यांनी पांगरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दि.१७ जून २०१९ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी बळीराम भागवत तावसकर,बाबासाहेब दिंगाबर घावटे,दोघेही राहणार ममदापूर,तालुका बार्शी,मनोज कोंडीबा गिराम,राहणार आगळगाव,तालुका बार्शी या तिघांनी संगनमत करून फिर्यादीची आई रेखा राजेंद्र यादव ही मयत झाली असताना आरोपींतानी मयत ही मयत असताना सुद्धा त्यांचे नावे स्टँम्प खरेदी करून त्यावर बनावट सही करून तिची मालमत्ता हडप करण्याचे उद्देशाने खोटा दस्तऐवज/करारपत्र तयार करून फिर्यादीची व नातेवाईकांची फसवणूक केली आहे.
म्हणून फिर्यादीने तिन्ही आरोपीं विरुध्द पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपीं विरुध्द फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ ( ३ ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अधिक तपास पांगरी पोलीस करीत असल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.
0 Comments