भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा स्फोट


श्रेयस अय्यर, शिखर धवन, आणि ऋतुराज गायकवाड सह संघातील काही खेळाडूंता अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे कळत आहे. सोमवारी (०१ फेब्रुवारी) भारताचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाल्यानंतर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली गेली होती. त्या चाचणीच्या अहवालात काही खेळाडू कोरोना संक्रमित झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे बीसीसीआय लवकरच या खेळाडूंचे पर्यायी खेळाडू घोषित करू शकते.

महत्त्वाचे म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आधीच शाहरुख खान आणि साई किशोर यांना राखीव खेळाडू म्हणून संघासोबत जोडले आहे.

Post a Comment

0 Comments