दिग्दर्शक आशिष कैलास जैन यांचा आगामी युथफुल चित्रपट 'दिशाभूल' चित्रपटात एव्हाना तेजस बर्वे, अमृता धोंगडे आणि माधुरी पवार यांची वर्णी लागली होती. आता या चित्रपटासाठी अजून एका चौथ्या कलाकाराची निवड झाली आहे. हँडसम अभिनेता अभिनय बेर्डे आता ‘दिशाभूल’ करताना दिसणार आहे, म्हणजे तो ‘दिशाभूल’ चित्रपटाचा भाग बनलाय.
सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या ‘दिशाभूल’ या चित्रपटाची निर्मिती आरती चव्हाण यांची असून दिग्दर्शन आशिष कैलास जैन करत आहेत. यात अभिनेता तेजस बर्वे, अभिनेत्री अमृता धोंगडे, सोशल मीडिया स्टार माधुरी पवार यांच्या बरोबर 'दिशाभूल' मध्ये असलेला चौथा अभिनेता महाराष्ट्राचा लाडका युवा अभिनेता अभिनय बेर्डे हा आहे. 'दिशाभूल' या मल्टीस्टारर मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत तो दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आपल्या भूमिकेबद्दल सांगताना अभिनेता अभिनय बेर्डे म्हणाला, “'दिशाभूल' हा एक वेगळ्या धाटणीची कथा असलेलला चित्रपट आहे. यातील माझी व्यक्तीरेखा ही मी आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी आहे.
0 Comments