“…पण ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना बीपीचा त्रास होईल”


काही दिवसांपासून राणे कुटुंबियांच्या अडचणींत वाढ होत असलेली पहायला मिळत आहे. अशातच काल भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन न्यायालयानं मंजूर केला. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. 

सिंधुदुर्गच्या जनतेला त्रास नको, कायदा आणि सुव्यवस्था कुठेही खराब माझ्यामुळे व्हायला नको. म्हणून मी माझ्या कुटुंबाशी चर्चा करून, माझ्या वकिलांशी चर्चा करून मी स्वत: सरेंडर झालो, असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आहे. पुढे नितेश राणे यांनी म्हटलं की, राजकारणाचा स्तर किती खाली गेलाय हा विचार करण्याची वेळ आली आहे. आता विषय न्यायप्रविष्ठ आहे, म्हणून या विषयावर बोलणार नाही, पण ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपीचा त्रास निश्चित पद्धतीने सुरु होईल.

दरम्यान, शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला. अशातच आता कोल्हापुरातील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं.

Post a Comment

0 Comments