एकनाथ शिंदेंच्या फोननंतर पोस्टरवरील 'भावी मुख्यमंत्री' शब्द हटवले



 एकनाथ शिंदे यांच्या भावी मुख्यमंत्री या पोस्टरमुळे राज्यभरात चर्चेला उधाण आले होते. याची दखल चक्क एकनाथ शिंदे यांना घ्यावी लागली आहे. त्यांनी फोन करून ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये लावलेले ते पोस्टर हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर भावी मुख्यमंत्री असे लिहिलेल्या या पोस्टवर पांढरा रंग लावावा लागला.

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर लावण्यात आले होते. त्यावर भावी मुख्यमंत्री असे लिहिण्यात आले होते. या संदर्भातील बातमी प्रकाशित झाल्यानंतर याची लगेच एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. त्यांनी फोन करून या पोस्टरवरील मजकूर काढण्याचे आदेश दिले आहेत. आता पोस्टरवर झालेला बदल हा ठाण्यात आणि महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे.

एकनाथ शिंदे यांनी पोस्टर लागलेल्या परिसरातील नगरसेवक राम रेपाळे यांना मजकूर बदलण्याचे आदेश दिले. यावर राम रेपाळे यांनी आम्ही शिवसैनिक आदेशावर चालत असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments