सांगोला/प्रतिनिधी:
सांगोला तालुक्यातील मेथवडे देवळे येथील कैलास बाबासो माळी (वय २८) वर्षीय सुशिक्षित बेरोजगार तरुणाला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १ लाख १२ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी कैलास माळी यांनी शनिवार १२ फेब्रुवारी रोजी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कैलास माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कैलास उत्तम चव्हाण राहणार नाशिक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
२०१९ मध्ये युनिक क्लासेसमध्ये ओळख झालेले नवनाथ भिंगारे राहणार पंढरपूर यांनी कैलास चव्हाण हे नोकरी लावत असल्याचे सांगितले. यावेळी भेट घेतली असता १ लाख ५० हजार रुपयांची मागणी करत कागदपत्रांची झेरॉक्स काढून घेण्यात आली. कैलास हे सुशिक्षित बेरोजगार असल्याने त्यांनी नोकरीच्या आशेने १ लाख ३७ हजार रुपये रक्कम दिली. बरेच दिवस झाले तरी नोकरी बाबत फोन केला नाही. फोन केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. कैलास माळी यांनी रेल्वे स्टेशनवर नोकरीच्या आदेश दाखवले. सदर आदेश बनावट असल्याचे सांगण्यात आले. चव्हाण यांच्या पत्नीने ५० हजार रुपये गुगल पे केले. चेक दिला असता सदर बँक खात्यात पैसे नसल्याचे सांगण्यात आले.
कैलास माळी या तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १ लाख १२ हजार ५०० रुपये काढून घेत खोटे नोकरीचे आदेश दाखवून फसवणूक करणाऱ्या कैलास चव्हाण राहणार नाशिक या इसमावर सांगोला पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments